सूर्यकुमार यादवची T20 कर्णधारपदावरून उचलबांगडी? IPL 2026 नंतर मोठा निर्णय घेतला जाणार, नवा कर्णधार कोण असणार?

Who will replace Suryakumar Yadav as India T20 captain? सूर्यकुमार यादवच्या T20 कर्णधारपदावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खराब फलंदाजी फॉर्ममुळे त्याच्या नेतृत्वावर दबाव वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. BCCI आगामी इंग्लंड दौऱ्यानंतर मोठा निर्णय घेऊ शकते, असे वृत्त आहे.
Will Suryakumar Yadav be removed as T20 captain after IPL 2026?

Will Suryakumar Yadav be removed as T20 captain after IPL 2026?

esakal

Updated on

Will Suryakumar Yadav be removed as T20 captain after IPL 2026? भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले जाण्याची माहिती समोर येत आहे. कर्णधार म्हणून सूर्या यशस्वी असला तरी या कालावधीत तो फलंदाज म्हणून अपयशी ठरला आहे आणि त्याला कर्णधारपदावरून हटवण्यामागे हेच एक कारण आहे. त्याचा खराब फॉर्म हा संघातील एक जागा अडवून ठेवतोय अशी चर्चा आहे. PTI ने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या फलंदाजीतील सातत्य नसल्यामुळे २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील भारतीय संघाच्या मोहिमेत सूर्यकुमारचा समावेश असेल की नाही, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com