

Suryakumar Yadav Mumbai T20 Captain
Sakal
बीसीसीआयची देशांतर्गत टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या आठवड्यात १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने नुकतेच मुंबईच्या टी२० संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमारला मुंबईच्या टी२० संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. त्याच्याकडे टी२० क्रिकेटचा असलेला अनुभव पाहाता त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे.