सूर्यकुमार यादव IPL 2026 नंतर आता, युगांडा संघाविरुद्ध ट्वेंटी-२० सामना खेळणार! मुंबईत ही मॅच कधी व केव्हा होणार?

Suryakumar Yadav to play against Uganda in Mumbai: सूर्यकुमार यादव IPL 2026 संपल्यानंतर आता एका विशेष ट्वेंटी-२० सामन्यात खेळताना दिसणार आहे.
Suryakumar Yadav To Play Against Uganda Team

Suryakumar Yadav To Play Against Uganda Team

esakal

Updated on

Suryakumar Yadav is set to play vs Uganda: भारताचा ट्वेंटी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आता तो आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तयारीला लागला आहे, परंतु त्याआधी तो ३० मे रोजी युगांडा संघाविरुद्ध ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून ट्वेंटी-२० सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्वेंटी-२० मुंबई लीगच्या नवीन हंगामापूर्वी त्याला एक महत्त्वपूर्ण संधी मिळेल. युगांडाचा संघ सध्या चार वन डे आणि चार ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी मुंबईत आहे. ट्वेंटी-२० प्रकारात, त्यांचा सामना १ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मुंबई लीगमधील चार वेगवेगळ्या संघांशी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com