Suryakumar Yadav reaction on Sanju Samson selection
esakal
India playing XI debate before IND vs SA Super 8: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ चा सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होणार आहे. आफ्रिकेने आधीच इथे तीन सामने खेळले आहेत, त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यात भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा याचा फॉर्म ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळेच सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवसमोर हा प्रश्न आलाच. पण, त्यावर त्याने मिश्किल उत्तरं दिली.