

SoBo Mumbai Falcons
Sakal
T20 Mumbai Women's League news: टी२० मुंबई महिला लीगमधील आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत, भारतीय स्टार खेळाडू सायली सातघरेने बुधवारी पुन्हा एकदा उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केली, तर १४ वर्षीय युवा खेळाडू स्वरा जाधवने गोलंदाजीत चमक दाखवली. या कामगिरीमुळे सोबो मुंबई फाल्कन्सने आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्सवर सात फलंदाज राखून सहज विजय मिळवला आणि स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय नोंदवला.