India most sixes in T20 World Cup history record
esakal
India surpass West Indies six hitting record T20 World Cup : भारतीय सलामीच्या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आज रडकुंडीला आणले.. अभिषेक शर्माच्या १८ चेंडूंत अर्धशतकानंतर संजू सॅमसननेही खणखणीत षटकारांनी फिफ्टी पूर्ण केली. त्याने सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरी व फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला. संजूने या विक्रमात शाहिद आफ्रिदी ( २००९) व विराट कोहली ( २०१४) यांच्याशी बरोबरी केली. या सामन्यातील आक्रमक फलंदाजीमुळे भारताने वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.