Abhishek Sharma out early in IND vs ENG semifinal
ESAKAL
T20 World Cup India vs England Semi Final Marathi Cricket News: अभिषेक शर्माने पुन्हा एकदा घाई करत विकेट फेकली. विल जॅक्सने टाकलेल्या दुसऱ्या षटकात अभिषेकने दोन चौकार मिळवले होते, परंतु त्याला अती हाव महागात पडली. जॅक्सने क्षेत्ररक्षणात बदल करून अभिषेकला बरोबर खेळाडू उभा आहे, तिथेच फटका मारण्यास भाग पाडले. अभिषेक ९ धावांवर माघारी परतला, पुढच्याच षटकात संजू सॅमसनही माघारी परतणारच होता, परंतु कर्णधार हॅरी ब्रूकने सोपा झेल टाकला.