Pat Cummins ruled out of T20 World Cup due to injury
esakal
Australia make two changes to T20 World Cup squad: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यास आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या वर्ल्ड कप संघात दोन बदल केले आहेत. कमिन्स त्याच्या पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्यामुळे तो भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळणार नाही. त्याच्यासह आघाडीचा फलंदाज मॅथ्यू शॉर्ट याचेही नाव १५ सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहे.