

T20 World Cup India
Sakal
India T20 World Cup Preparation : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील यजमान भारतीय संघ ७ फेब्रुवारीला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याआधी बुधवारी (४ फेब्रुवारी) भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. पण त्याआधी भारतीय संघाला (Team India) वॉशिंग्टन सुंदरच्या सहभागाबाबत चिंता आहे.
या स्पर्धेपूर्वी भारताचे तिलक वर्मा (Tilak Varma) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुखापतग्रस्त होते. पण तिलकने सोमवारी (२ फेब्रुवारी) अमेरिकेविरुद्ध सराव सामन्यात भारत अ संघाकडून ३८ धावांची धावांची खेळी करत त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. मात्र अद्याप वॉशिंग्टन सुंदर पूर्ण बरा झालेला नाही.