

Ruturaj Gaikwad - Tilak Varma
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला आता येत्या १० दिवसात सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता तर शिगेला पोहचत आहेच, त्यासोबतच संघांची अंतिम तयारीही सुरू झाली आहे. येत्या काही दिवसातच सहभागी संघ यजमान भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये पोहचतील.
सध्या अनेक देश अंतिम तयारीच्या दृष्टीने द्विपक्षीय मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. भारतीय संघही (Team India) न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. पण यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वच सहभागी संघांना टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी सराव सामने (T20 World Cup 2026 Warm Up) खेळायचे आहेत. हे सराव सामने २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान खेळले जाणार असल्याची शक्यता आहे.