Brian Bennett best catch of T20 World Cup 2026
esakal
T20 World Cup Zimbabwe vs Oman Marathi Cricket Live News : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ओमानवर विजय मिळवून ब गटात अव्वल स्थानी झेप घेतली. त्यांनी श्रीलंकेला ( १.०००) नेट रन रेटमध्ये ( २.७०२) मागे टाकले आणि नंबर वन बनले. ओमानचे १०३ धावांचे लक्ष्य झिम्बाब्वेने १३.३ षटकांत २ बाद १०६ धावा करून पार केले. या सामन्यात ब्रायन बेनेट ( Brian Bennett) याचा झेल हा चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी याला यंदाच्या वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल म्हणून घोषित केले.