PCB’s India Boycott Backfires As Other Boards Refuse To Back Pakistan
esakal
India Pakistan T20 World Cup controversy latest News : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB ) लाज वाटेल असे पत्र इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) पाठवले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने जाहीर केला. पीसीबीनेही सरकारचे ऐकून india vs pakistan मॅच खेळणार नसल्याचे म्हटले. त्यांच्या या निर्णयाचा केवळ पीसीबीलाच नव्हे तर संलग्न संघटनांनाही आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळेच श्रीलंका बोर्डापाठोपाठ आता इसीबीनेही पाकिस्तानला केलेल्या उपराकांची जाण करून देणारे पत्र पाठवले आहे.