India defeated Zimbabwe in the Super 8s of the T20 World Cup to stay alive in the semi-final race
esakal
भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांची सर्वोत्तम धावसंख्या उभारली
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठऱली
India beat Zimbabwe in Super 8s T20 World Cup : भारतीय संघाने सुपर ८ मधील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवताना उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. भारताने वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वोत्तम धावसंख्या उभारताना अनेक विक्रम नोंदवले. भारताचा झिम्बाब्वेवरील विजय हा दक्षिण आफ्रिकेचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के करणारा ठरला. आता भारताच्या उपांत्य फेरीच्या मार्गात वेस्ट इंडिज हा एकमेव अडथळा उरला आहे. त्यामुळे १ मार्चला कोलकाताच्या इडन गार्डनवर होणारा सामना भारतासाठी उपांत्यपूर्व फेरीसारखाच असणार आहे.