India playing XI prediction vs South Africa T20 WC
esakal
India playing XI prediction vs South Africa T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप फेरीत भारताने सहज विजय मिळवून सुपर ८मधील आपली जागा पक्की केली. आता सुपर ८ मध्ये भारतासमोर दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजसारखे तगडे संघ आहेत. ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांना घाम फोडणारा झिम्बाब्वेचा संघही ग्रुप १ मध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता खऱ्या अर्थाने कडवी टक्कर मिळणार आहे. अ गटातील लढतीत भारतीय फलंदाज फिरकीसमोर अडखळताना दिसले आणि ही गोष्ट आता प्रतिस्पर्ध्यांना माहित झाली आहे. त्यामुळेच आता टीम इंडिया त्यांना अचंबित करणारी रणनिती आखण्याच्या तयारीत आहेत.