T20 World Cup मधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंड मायदेशी मग आम्हीच भारतात का अडकलो? द. आफ्रिका-वेस्ट इंडिज खेळाडू ICC वर तापले

De Kock and Miller Slam ICC Over England Bias: टी२० वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात अडकले आहेत, तर इंग्लंड संघ मायदेशी परतला आहे. आयसीसीवर दुजाभावाचा आरोप होत आहे.
West Indies & South Africa Stuck in India Amid Israel-Iran Conflict

West Indies & South Africa Stuck in India Amid Israel-Iran Conflict

Sakal

Updated on

De Kock and Miller Slam ICC Over England Bias: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात रविवारी (८ मार्च) रंगणार आहे. मात्र असे असतानाच नवा वाद समोर येत आहे. या स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतरही वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ भारतातच आडकले आहेत.

मात्र इंग्लंड संघ मायदेशी परतला आहे. वेस्ट इंडिज संघ १ मार्च २०२६ रोजी भारताविरुद्ध सुपर-८ सामन्यात पराभूत झाल्यानंतर या स्पर्धेतून बाहेर झाला. तसेच ४ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर झाला. तसेच इंग्लंड संघ ५ मार्च रोजी भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभूत झाला.

<div class="paragraphs"><p>West Indies &amp; South Africa Stuck in India Amid Israel-Iran Conflict</p></div>
India vs New Zealand T20 World Cup Final: टी-२० विश्वकरंडकाची अंतिम लढत; सूर्यकुमारच्या संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com