T20 World Cup ENG vs WI : वेस्ट इंडिजने पुन्हा इंग्लंडला नमवले ! स्वतः सेफ झाले, पण क गटात स्कॉटलंडसोबत लावलं भांडण

T20 World Cup England vs West Indies Marathi News: वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील बहुप्रतिक्षित लढतीत विंडीजने पुन्हा एकदा बाजी मारली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला, पण निर्णायक क्षणी वेस्ट इंडिजने वरचष्मा राखत दुसरा विजय नोंदवला.
West Indies Seal Second Win; England’s Super 8 Hopes In Danger

West Indies Seal Second Win; England’s Super 8 Hopes In Danger

esakal

Updated on

ENG vs WI: Windies Go Top, England Face Must-Win Clash Marathi Cricket Update News: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे दोन माजी वर्ल्ड कप विजेते संघ समोरासमोर आल्यावर चुरस पाहायला मिळणे अपेक्षित होतेच. वेस्ट इंडिजने बुधवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद करताना इंग्लंडला पराभूत केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला, परंतु विंडीजचा संघ वरचढ ठरला. या विजयासह वेस्ट इंडिज क गटात ४ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे, तर इंग्लंड तिसऱ्या स्थानी कायम राहिला आहे. आजच्या सामन्याने क गटातील चुरस रंगतदार झाली आहे. स्कॉटलंडही २ गुणांसह Super 8s च्या शर्यतीत आहे. त्यामुळे इंग्लंड वि. स्कॉटलंड हा सामना नॉक आऊट बनला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com