TEAM INDIA BOYCOTTED AWARD CEREMONY
esakal
India vs Pakistan Asia Cup 2025 Final Marathi News : आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली. भारतीय संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट ठेवली होती. त्यामुळेच जेतेपदाची ट्रॉफी देण्याचा मान आशियाई क्रिकेट परिषदेचे व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना गमवावा लागला. सूर्यकुमार यादव व सर्व खेळाडूंनी नक्वी यांच्याहस्ते ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळ्याला जवळपास दीड तास उशीराने सुरुवात झाली.