
भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळण्यासाठी दुबईला पोहोचला आहे, तसेच सरावालाही सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या चॅम्पियन्स ट्रॉफीचे मुख्य आयोजक असले, तरी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने खेळण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे भारत वगळता इतर संघ पाकिस्तानमध्ये सामने खेळणार आहेत, तर भारतीय संघ दुबईत सामने खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी दुबईत पोहचला.