

Team India Honors Retiring Tammy Beaumont and Heather Knight
Sakal
India Women vs England Women Lord's Test: भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी (१३ जुलै) क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानात इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला. लॉर्ड्सवर इतिहासातील पहिलाच महिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड संघात खेळवला गेला.
या सामन्यात भारतीय संघाने तब्बल २७० धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे लॉर्ड्सवर पहिल्या महिला कसोटी सामन्यात विजय मिळवण्याचा मान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मिळाला.