

India T20 Team
Sakal
India vs Zimbabwe T20I Series Marathi News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (१ एप्रिल) आणखी एका परदेशी दौऱ्याची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघांचं आयपीएल २०२६ नंतरचं वेळापत्रक बरंच व्यस्त असणार आहे. भारताला जून-जुलै महिन्यात युरोप दौऱ्यावर जायचे आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघ आयर्लंडमध्ये दोन सामन्यांची टी२० मालिका खेळेल. त्यानंतर १ जुलैपासून भारताला इंग्लंडमध्ये टी२० आणि वनडे मालिका खेळायची आहे. त्यानंतर लगेचच भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून त्याची घोषणा बुधवारी बीसीसीआयने केली.