longest Test match in cricket history
esakal
England vs South Africa timeless Test facts : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातली कसोटी मालिका नुकतीच संपली. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती इंग्लंड-ऑस्ट्रेलिया Ashes मालिकेची.. २१ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होतेय आणि त्याच्या सात दिवस आधी भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका सुरू होत आहे. सध्याच्या कसोटी मालिका तीन दिवसांत संपतात, परंतु एक कसोटी तब्बल १२ दिवस चालली होती. अर्थात त्यात विश्रांतीचा काळही होता. पण, कसोटीचा निकाल लागेपर्यंत दोन्ही संघाची खेळण्याची तयारी होती. मात्र, दुसऱ्या संघाला परतीच्या प्रवसाची नौका पकडायची असल्याने त्यांना सामना अर्धवट सोडून परतावे लागले...