

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू होण्यासाठी आता आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. अशात खेळाडू हळुहळू संघात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पाचवेळचे विजेते मुंबई इंडियन्स संघातही कर्णधार हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ड असे खेळाडू सामील झाले आहेत. काहीच दिवसात रोहित शर्माही संघात येणार आहे.
त्यामुळे जे खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची सरावाला सुरुवात झाली, पण त्याचबरोबर संघात थोडी मजा-मस्तीही सुरू असते. याचदरम्यान हार्दिक पांड्याच्या लेकासोबत तिलक वर्मा क्रिकेट खेळातानाही दिसला आहे.