
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात गुरुवारी अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सला ४७ विकेट्सने पराभूक केले आणि दुसऱ्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना गाठला.
याआधी पहिल्या हंगामातही मुंबई इंडियन्सच्या संघाने अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासोबत विजेतेपद मिळवलं होतं. त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले होते.