
ड्रीम ११ने ‘ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल’ मंजूर झाल्यानंतर टीम इंडियाच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली.
बीसीसीआयला आता आशिया चषक २०२५पूर्वी नवा टायटल स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.
ड्रीम ११ने जुलै २०२३ मध्ये ३५८ कोटी रुपयांमध्ये मुख्य स्पॉन्सरशिप मिळवली होती; त्याआधी Byju’s स्पॉन्सर होते.
Who Will Replace Dream11? BCCI Sponsorship Race Heats Up : ड्रीम ११च्या माघारीनंतर आता बीसीसीआयने टीम इंडियासाठी नव्या टायटल स्पॉन्सरचा शोध सुरू केला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत "ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल" मंजूर झाल्यानंतर ड्रीम ११ने ते आता भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजक राहणार नाहीत, असे BCCI ला कळवले.