

Travis Head Post on 2023 World Cup Fina
esakal
Travis Head Post on 2023 World Cup Final: १९ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावलं होतं.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने शतकी खेळी करत भारताच्या हातातून विजय खेचून आणला होता. आता याच आठवणीला उजाळा देत ट्रेविस हेडने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना पुन्हा त्या पराभवाची आठवण झाली आहे.