South Africa Shocked Ahead of Series Decider; India Senses Big Opportunity
esakal
India vs South Africa 3rd ODI Live Update in Marathi : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा वन डे सामना काही तासांत विशाखापट्टणम येथे सुरू होणार आहे. आफ्रिकेने दुसरी वन डे लढत जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे आणि त्यामुळे आजचा सामना निर्णायक आहे. पण, त्याआधीच पाहुण्या आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या तीन प्रमुख खेळाडूंनी तिसऱ्या वन डेतून माघार घेतली आहे.