India vs Pakistan :'दोन गुण महत्त्वाचे नाही'! गौतम गंभीरलाही नकोय पाकिस्तानविरुद्धचा सामना, बहिष्कार टाकण्याची इच्छा; म्हणाला...

Gautam Gambhir’s Strong Stand Resurfaces: भारत-पाकिस्तान सामन्यांवरून सुरू असलेल्या वादात माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचं जुने पण ठाम मत पुन्हा चर्चेत आलं आहे. “वर्ल्ड कपमध्ये दोन गुण मिळणं महत्त्वाचं नाही,” अशी भूमिका त्याने मांडली आहे.
Gautam Gambhir reiterates his stand against India playing Pakistan in World Cups

Gautam Gambhir reiterates his stand against India playing Pakistan in World Cups

esakal

Updated on

Gautam Gambhir wants India to boycott Pakistan: पाकिस्तानने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर त्यांचा हा निर्णय जाहीर केला. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या सर्व लढती श्रीलंकेत होणार आहे, कारण भारतात खेळण्यास त्यांचा विरोध आहे. त्यामुळे ते फायनलला पोहोचल्यास तो सामना श्रीलंकेतच होईल. १५ फेब्रुवारीला होणाऱ्या India vs Pakistan सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला असला तरी भारत श्रीलंकेत जाणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार सूर्यकुमार यादवची टीम मैदानावर टॉससाठी जाईल आणि पाकिस्तान न आल्यास भारताला दोन गुण मिळतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com