Vaibhav Sooryavanshi Falls Short of Century  

Vaibhav Sooryavanshi Falls Short of Century  

esakal

Vaibhav Sooryavanshi: वर्ल्ड कपपूर्वी वैभवची प्रतिस्पर्धींना धडकी भरवणारी खेळी; ९ चौकार, ७ षटकारांची आतषबाजी, १९२ चा स्ट्राईक रेट पण, थोडक्यात हुकलं शतक

ICC Men's Under-19 World Cup Warm-up Matches: ICC पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे ठोस संकेत दिले. स्कॉटलंडविरुद्धच्या सराव सामन्यात वैभवने खणखणीत फटकेबाजी करताना प्रतिस्पर्धी संघांना धडकी भरवणारी खेळी केली.
Published on

India U19 vs Scotland warm-up Vaibhav Sooryavanshi innings : तुफान फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीने वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी प्रतिस्पर्धी संघांना धडकी भरवणारी खेळी केली आहे. वैभवने सातत्याने धावा करताना क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १४ वर्षीय फलंदाजाची फटकेबाजी पाहण्यासाठी सारेच आतुर आहेत आणि १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत वैभवच चमकेल असा विश्वास आहे. आयसीसीनेही या वर्ल्ड कप स्पर्धेत चमक दाखवण्याची धमक राखणाऱ्या १२ खेळाडूंमध्ये भारताच्या युवा रन मशीनचा समावेश केला आहे. त्याने सराव सामन्यात आक्रमक खेळ करून त्यांचा हा विश्वास सार्थ असल्याचे दाखवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com