Vaibhav Suryavanshi explosive fifty vs Malaysia U19 Asia Cup
esakal
Vaibhav Suryavanshi explosive fifty vs Malaysia U19 Asia Cup: १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने सलग दोन विजय मिळवून उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली आहे. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात १७१ धावांची ( वि. यूएई) खेळी करून विक्रमांना गवसणी घातली. पाकिस्तानविरुद्ध विरुद्ध त्याला अपयश आले असले तरी मलेशियाविरुद्ध त्याने आज वादळी अर्धशतक झळकावले. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १० षटकांत ९० धावा केल्या, परंतु वैभवसह तीन विकेट्सही गमावल्या.