
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेटपटू एकत्र खेळताना दिसत आहेत. अशात काही खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात.
असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात रिषभ पंतने संघसहकाऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतल्याचे दिसत आहे. रिषभ पंत त्याच्या दिलखुलास स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे जगभरातील खेळाडूंची चांगले मैत्रीपूर्ण संबंधही आहेत. हेच या व्हिडिओतूनही दिसते.