
U19 India vs West Indies Women: १९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत रविवारी १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध झाला. क्वालालंपूर येथे झालेल्या या सामन्यात भारताने १९ वर्षांखालील वेस्ट इंडिज महिला संघाला ९ विकेट्सने पराभूत करत स्पर्धेची मोहिम विजयाने सुरू केली. या संपूर्ण सामन्यात भारतीय महिला संघांचे वर्चस्व दिसून आले.