
मलेशियामध्ये सध्या १९ वर्षांखालील महिला संघाची टी२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील साखळी फेरी आणि सुपर सिक्स फेरी संपली आहे. सुपर सिक्समधील सर्व सामने २९ जानेवारी रोजी संपले. त्यानंतर आता अंतिम चार संघ निश्चित झाले असून या चार संघात उपांत्य फेरी खेळवण्यात येईल.