

U19 India Team
Sakal
U19 World Cup 2026 Where to watch:१९ वर्षांखालील वनडे वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा गुरुवारपासून (१५ जानेवारी) सुरू होणार आहे. यंदाचे हा १६ वा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप असणार आहे.
नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत म्हणजेच २३ दिवस हा वर्ल्ड कप होणार आहे. १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत सर्वात यशस्वी संघ राहिला आहे.