India vs Pakistan U19 World Cup semi final qualification scenario
esakal
Cricket
U19 World Cup Scenario: अफगाणिस्तान, इंग्लंड हेही उपांत्य फेरीत पोहोचले; आता India vs Pakistan लढतीत चौथा संघ निश्चित होणार
India vs Pakistan U19 World Cup semi final qualification scenario : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीची शर्यत आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांनी आपापले सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. इंग्लंडने न्यूझीलंडचा तर अफगाणिस्तानने आयर्लंडचा सहज पराभव करत आपली ताकद दाखवून दिली.
England Afghanistan qualify for U19 World Cup semi finals: ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंड व अफगाणिस्तान यांनी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली आहे. इंग्लंडने शुक्रवारी न्यूझीलंडचा, तर अफगाणिस्तानने आयर्लंडचा पराभव केला. मॅनी लुम्सडेनच्या पाच विकेट्सच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडला १६९ धावांवर गुंडाळले, तर फैझल शिनोझादाच्या १६३ धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने १९१ धावांनी विजय मिळवला.
