Kapil Dev strongly criticises Pakistan’s decision to boycott India
esakal
Pakistan cricket boycott impact on players : India vs Pakistan यांच्यातला क्रिकेट सामना पाहण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC ) स्पर्धेत उभय संघांचा सामना होतो. पण, आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप त्याला अपवाद ठरणार आहे. पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तान क्रिकेट संघाला मनाई केली आहे आणि त्यामुळे १५ फेब्रुवारीला होणारा सामना जवळपास रद्दच आहे. पाकिस्तान मैदानावर न उतरल्यावर टीम इंडियाला दोन गुण मिळणार आहेत. पण, पाकिस्तानच्या या भूमिकेवर वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव ( Kapil Dev ) यांनी संताप व्यक्त केला आहे.