
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सध्या दमदार फॉर्ममध्ये खेळत आहे. नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात त्याने दोन्ही डावात शतके केली होती. या सामन्यात भारताचा जरी पराभव झाला असला, तरी रिषभने त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते.
त्याने दोन शतके करताना इतिहासही घडवला. तो एकाच कसोटीत दोन्ही डावात शतके करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. दरम्यान, रिषभ सध्या जरी चांगल्या फॉर्ममध्ये असला, तरी साधारण ६ ते ७ महिन्यांपूर्वीची परिस्थिती बरीच वेगळी होती.