

WPL 2026, MI vs UPW
Sakal
Mumbai Indians lost against UP Warriorz : वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (WPL) १० वा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हा पाच सामन्यांतील तिसरा पराभव आहे, तर युपी वॉरियर्सचा (UP Warriorz) पाच सामन्यांतील दुसरा विजय ठरला.
या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर युपी वॉरियर्सने १८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला २० षटकात ६ बाद १६५ धावाच करता आल्या. मुंबईसाठी एमेलिया केर आणि अमनज्योत कौर यांनी झुंज दिली. मात्र त्यांना संघाला विजयापर्यंत नेता आले नाही.