WPL 2026, DC vs UPW: जेमिमा रोड्रिग्सच्या दिल्ली कॅपिटल्सचा पहिला विजय! थरारक सामन्यात युपी वॉरियर्स शेवटच्या चेंडूवर पराभूत

Delhi Capitals beat UP Warriorz: वूमन्स प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सला शेवटच्या चेंडूवर ७ विकेट्सने पराभूत केले. जेमिमा रोड्रिग्सच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा हा पहिलाच विजय होता.
Delhi Capitals

Delhi Capitals

Sakal

Updated on: 

वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स संघात पार पडला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात जेमिमा रोड्रिग्सच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्याच चेंडूवर ७ विकेट्सने विजय मिळवला. हा दिल्लीचा पहिलाच विजय ठरला आहे. मात्र युपीला अद्यापही पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.

या सामन्यात युपीने दिल्लीसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दिल्लीने ३ विकेट्स गमावून २० षटकात १५८ धावा करून पूर्ण केला. दिल्लीकडून लिझेल लीने महत्त्वपूर्ण अर्धशतक केले.

<div class="paragraphs"><p>Delhi Capitals</p></div>
WPL 2026 : मुंबई इंडियन्स, RCB च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; नवी मुंबईतील सामन्यांत ३ दिवस प्रेक्षकांना परवानगी नाही, कारण...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com