IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Video

Vaibhav Sooryavanshi’s Incredible Diving Catch: भारतीय अ संघाने अफगाणिस्तान अ संघाला तिरंगी मालिकेत पराभूत केले. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने एक अफलातून झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Vaibhav Sooryavanshi Catch | India A vs Afghanistan A

Vaibhav Sooryavanshi Catch | India A vs Afghanistan A

Sakal

Updated on

India A vs Afghanistan A ODI: तिरंगी वनडे मालिकेत भारतीय अ संघाने बुधवारी अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. डंबुला येथे झालेल्या या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघाने अंतिम सामन्यातील स्थानही जवळपास पक्के केले आहे.

या सामन्यात १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशीही (Vaibhav Sooryavanshi) भारतीय संघाचा भाग होता. त्याने फलंदाजीत मोठी खेळी केली नाही, पण क्षेत्ररक्षण करताना त्याने एक अफलातून झेल घेत सर्वांचे लक्ष वेधले.

Vaibhav Sooryavanshi Catch | India A vs Afghanistan A
IND A vs AFG A : ऋतुराज गायकवाडच्या विकेटवरून वाद.... वैभव बाद होता, त्याला दिले नाबाद अन् इथे ऋतूची विकेट ढापली Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com