Vaibhav Sooryavanshi has been named Bihar captain at just 15 for the first two matches of Syed Mushtaq Ali Trophy 2026-27
esakal
Vaibhav Sooryavanshi Bihar captain for Syed Mushtaq Ali Trophy: वैभव सूर्यवंशी खूप पटापट यशाचे टप्पे पादाक्रांत करत चालला आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सने पदार्पणाची संधी दिली आणि पठ्ठ्याने १४ व्या वर्षी वेगवान शतक ठोकले. त्यानंतर आयपीएल २०२६ गाजवून त्याने ऑरेंज कॅप नावावर करताना अनेक वर्ल्ड रेकॉर्ड मोडले. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. त्याआधी त्याने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपही उंचावला. आता त्याच्याकडे थेट कर्णधारपद दिले गेले आहे आणि त्याच्यासाठी या वयात मिळालेली ही खूप मोठी गोष्ट आहे.