Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

Vaibhav Sooryavanshi cries after Rajasthan Royals defeat : Vaibhav Sooryavanshi याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर २ सामन्यात ९६ धावांची शानदार खेळी केली, पण तरीही राजस्थान रॉयल्सला पराभव टाळता आला नाही. त्यामुळे सामना संपल्यानंतर हा १५ वर्षीय युवा फलंदाज अत्यंत भावूक झालेला दिसला.
Vaibhav Sooryavanshi cries after Rajasthan Royals defeat

Vaibhav Sooryavanshi cries after Rajasthan Royals defeat

Updated on

Vaibhav Sooryavanshi turned emotional: गुजरात टायनट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या फायनलमध्ये ऐटित प्रवेश केला. क्वालिफायर २ मध्ये गुजरातने शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. २१५ धावांचे लक्ष्य GT ने १८.४ षटकांत ३ बाद २१९ धावा करून पार केले. गुजरातने तिसऱ्यांदा आयपीएल फायनल गाठली आहे आणि त्यांना अहमदाबादच्या घरच्या मैदानावर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ३१ मे रोजी फायनल खेळावी लागणार आहे. पण, या सामन्यानंतर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या ( Vaibhav Sooryavanshi) डोळ्यांत अश्रू तरळलेले दिसले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com