Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफीत अचानक बदललं चित्र! इशान किशनला नेमकं काय झालं? १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे आली कर्णधारपदाची धुरा

Vaibhav Sooryavanshi Captain: दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत इशान किशनला दुखापत झाल्यानंतर अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे ईस्ट झोनच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
Vaibhav Sooryavanshi Captain

Vaibhav Sooryavanshi Captain

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Captain: अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीमध्ये मोठा टप्पा गाठला आहे. बंगळुरूमध्ये सेंट्रल झोनविरुद्ध सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याच्यावर ईस्ट झोनचे कर्णधारपद सोपवण्यात आले. नियमित कर्णधार इशान किशनला दुखापत झाल्याने वैभवला अचानक ही जबाबदारी घ्यावी लागली.

या सामन्यापूर्वी वैभवची ईस्ट झोनच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती. मात्र, सामन्यादरम्यान इशान किशनला दुखापत झाल्याने परिस्थिती बदलली. त्यामुळे वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी वैभवला वरिष्ठ प्रथम श्रेणी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com