Shahid Afridi Comparison For Vaibhav Sooryavanshi
esakal
Mohammad Yousuf statement on Vaibhav Sooryavanshi batting style: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने जगाला वेड लावले आहे... सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या त्याच्या ९७ धावांच्या वादळी खेळीने आयपीएलमधील अनेक विक्रम नेस्तानाबूत झाले. आता त्याला भारताच्या संघात लवकर एन्ट्री द्या अशी मागणी होतेय... महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी स्वतःला भाग्यवान म्हटले, कारणी त्यांनी १५ वर्षीय सचिन तेंडुलकरचे पदार्पण पाहिले आणि आता १५ वर्षांच्या वैभवची आक्रमक खेळी... त्यात पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याने तर वैभवची तुलना थेट शाहिद आफ्रिदीसोबत केली आहे. पण, भारतीयांना ही तुलना आवडली नाही आणि त्यांनी त्याला फैलावर घेतले आहे.