IND A vs UAE: २८ षटकार अन् ७ चौकार... वैभव सूर्यवंशीची वादळी डबल सेंच्युरी! भारताने फक्त १५ ओव्हरमध्ये जिंकली ODI मॅच

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रमी द्विशतकी खेळी केली आहे. त्याने त्याच्या खेळीत २८ षटकार मारले आहेत. त्याच्या खेळीमुळे भारतीय अ संघाने युएईविरुद्ध रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत विजय मिळवला.
Vaibhav Sooryavanshi | India A vs UAE  Rising Star Asia Cup 2026

Vaibhav Sooryavanshi | India A vs UAE Rising Star Asia Cup 2026

Sakal

Updated on: 

रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय अ संघाने संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध फक्त १५ षटकात ७ विकेट्सने विजय मिळवला आहेत. भारताच्या विजयात वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रमी द्विशतक करत मोठे योगदान राहिले. दोहामध्ये झालेल्या या सामन्यात वैभवने अक्षरश: मैदानात षटकांचा पाऊस पाडला. त्याच्याविरुद्ध प्रत्येक गोलंदाज अपयशी ठरत होता. या विजयासह भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्यात युएईने २५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने फक्त १४.२ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले. एकट्या वैभव सूर्यवंशीने २८ षटकात आणि ७ चौकारांसह २०४ धावांची खेळी केली. त्याने फक्त ५० चेंडूत द्विशतक करत निश्वविक्रम केला. तो सर्वात कमी चेंडूत लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा खेळाडू ठरला आहे. इतकंच नाही, तर कोणत्याही प्रोफेशनल क्रिकेट सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...