

Vaibhav Sooryavanshi | India A vs Sri Lanka A
Sakal
India A vs Sri Lanka A: भारतीय अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून डंबुला येथे तिरंगी वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (मंगळवार, ९ जून) खेळवला जात आहे.
या मालिकेसाठी भारतीय अ संघ तिलक वर्माच्या नेतृत्वात खेळत आहे. याशिवाय १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) या मालिकेतील आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदुही आहे. मात्र पहिल्याच सामन्यात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले.