

Vaibhav Sooryavanshi
esakal
VAIBHAV SOORYAVANSHI: भारत अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिथे सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेतील चौथा सामना आज भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात खेळला जात आहे. या मालिकेत आतापर्यंत तिन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला असल्याने स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे.
या सामन्यात सगळ्यांचे लक्ष १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवर(Vaibhav Sooryavanshi) होते. मात्र, आक्रमक सुरुवात करूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याच्या विकेटचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.