IND A vs SL A : वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये मोठा राडा, भारताच्या पराभवनंतर मैदानात ड्रामा, Viral Video

Vaibhav Sooryavanshi Clashes With Sri Lanka A Players : भारतीय अ संघाला तिरंगी वनडे मालिकेत श्रीलंका अ संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये मोठा वाद झाला.
Vaibhav Sooryavanshi Clashes With Sri Lanka A Players | India A vs Sri Lanka A

Vaibhav Sooryavanshi Clashes With Sri Lanka A Players | India A vs Sri Lanka A

Sakal

Updated on

India A vs Sri Lanka A, ODI Match: श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी वनडे मालिकेत सोमवारी यजमान श्रीलंका अ आणि भारत अ संघात साखळी फेरीतील दुसरा सामना झाला. शेवटपर्यंत अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात श्रीलंका अ संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. पण या सामन्याच्या शेवटी श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) यांच्यात मोठा वाद (Heated Exchage) झाल्याचे दिसले.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सूर्यांश शेडगे (७२) आणि विपराज निगम (५१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४९.२ षटकात सर्वबाद २६५ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून मोगम्मद शिराज आणि विजयकांत वियासकांत यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

Vaibhav Sooryavanshi Clashes With Sri Lanka A Players | India A vs Sri Lanka A
IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com