Vaibhav Sooryavanshi international cricket selection debate
esakal
Vaibhav Sooryavanshi international cricket selection debate: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी, हा इंडियन प्रीमअर लीग २०२६ गाजवतोय. त्याने १५ सामन्यांत १ शतक व ४ अर्धशतकांसह ६८० धावा केल्या आहेत आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अव्वल स्थानी आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर लढतीत त्याने २९ चेंडूंत १२ षटकार व ५ चौकारांसह ९७ धावांची विक्रमी खेळी केली. त्यानंतर आता वैभवला तातडीने टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघात स्थान मिळायला हवे, अशी मागणी होताना दिसत आहे. पण, याला माजी फलंदाज आकाश चोप्रा ( Aakash Chopra) याचा विरोध आहे. त्याच्या मते वैभवला संघात घेण्याची घाई करू नका...