IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

IPL 2026 Orange Cap standings latest update: आयपीएल २०२६ मधील ऑरेंज कॅपची शर्यत आता अत्यंत रंगतदार झाली असून राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सर्वांच्या पुढे आहे. वैभवने आतापर्यंत ६८० धावा करत अव्वल स्थान मजबूत केले आहे.
IPL 2026 Orange Cap race latest standings

IPL 2026 Orange Cap race latest standings

esakal

Updated on

How many runs Virat Kohli behind Vaibhav Sooryavanshi? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ची ट्रॉफी कोणत्या संघाच्या हाती जाईल, याचा फैसला दोन सामन्यानंतर होणार आहे. शुक्रवारी मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर २ चा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करणार आहे. सर्वांच्या नजरा GT vs RR लढतीकडे लागल्या आहेत, कारण या सामन्यात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेले तीन फलंदाज एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करून ९७ धावांची वादळी खेळी केली आणि तो Orange Cap च्या शर्यतीत अव्वल स्थानावर पोहोचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com