'ए' गरम पाणी पीत जा!’ भर मैदानात वैभव सूर्यवंशीला मिळाला खास सल्ला, VIDEO व्हायरल

VAIBHAV SOORYAVANSHI VIRAL VIDEO: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीला एका महिला चाहतीने ‘गरम पाणी पीत जा, थंड पाणी नको’ असा सल्ला दिला. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VAIBHAV SOORYAVANSHI VIRAL VIDEO

VAIBHAV SOORYAVANSHI VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

VAIBHAV SOORYAVANSHI VIRAL VIDEO: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला वैभवला भर मैदानात सल्ला देताना दिसत आहे. झालं असं की, भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.

या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ५ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामन्यांची मोठी मालिका खेळणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी तिसरा टी-२० सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये भारतीय संघाने मोठ्या अंतराने विजय मिळवत मालिकेतही आघाडी घेतली. याच सामन्यातील एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com